महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 11, 2021, 9:06 PM IST

Updated : Apr 12, 2021, 5:07 PM IST

ETV Bharat / briefs

पुण्यात कॅब चालकाचा आयटीत नोकरी करणाऱ्या युवतीवर बलात्कार

पुण्यातील आयटी कंपनीतील एका महिलेवर कॅब चालकाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. गुंगीचे औषध टाकलेले पाणी प्यायला दिले. नंतर अश्लील फोटो काढून धमकावले आणि बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

पुणे
पुणे

पुणे -पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयटी कंपनीतील नोकरी संपल्यानंतर ओला कॅबमधून घरी जाण्यासाठी निघालेल्या एका 32 वर्षीय विवाहित महिलेवर कॅब चालकाने पाण्यामधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. आरोपीने पीडित महिलेचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 32 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कॅब चालक प्रमोद बाबू कनोजिया (रा. कर्वेनगर) याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार 4 ते 30 मार्च दरम्यान धायरी येथील एका लॉजवर घडला.

गुंगीचे औषध टाकलेले पाणी दिले प्यायला

या प्रकरणी अधिक माहिती अशी, की पीडित महिला ही पुण्यातीलच एका आयटी कंपनीत काम करते. तर आरोपी ओला कॅब चालक आहे. 4 मार्च रोजी संबंधित महिलेने मांजरी परिसरातून घरी जाण्यासाठी कॅब बूक केली होती. कॅबमध्ये बसल्यानंतर तहान लागल्याने तिने कॅब चालकाकडे पाणी मागितले. चालकाने तिला गुंगीचे औषध टाकलेले पाणी पिण्यासाठी दिले. हे पाणी पिल्यानंतर महिला बेशुद्ध झाली.

अश्लील फोटो काढून…

त्यानंतर आरोपीने तिला धायरी येथील एका लॉजवर नेले. तिचे अश्लील फोटोही काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

सुरवातीला या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही महिला ज्या ठिकाणाहून कॅबमध्ये बसली ते ठिकाण हडपसर पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

Last Updated : Apr 12, 2021, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details