वाशिम- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगरूळपीर शहरातील सूज्ञ नागरिक आणि व्यापाऱ्यांनी शहरात तीन दिवसासाठी जनता कर्फ्यू ठेवला आहे. या कर्फ्यूला आज मंगरूळपीर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे.
मंगरूळपीर येथे 3 दिवस जनता कर्फ्यू; कर्फ्यूला व्यापारी व नागरिकांचा उत्तम प्रतिसाद - 3 days Janta curfew mangrulpeer
सर्व व्यापार्यांनी अत्यावश्यक सेवा सोडून स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला सहकार्य केले. मंगरुळपीर तालुक्यासह शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी 10 जुलैला बंदचा निर्णय घेतला होता.
Janta curfew mangrulpeer
सर्व व्यापार्यांनी अत्यावश्यक सेवा सोडून स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला सहकार्य केले. मंगरूळपीर तालुक्यासह शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी 10 जुलैला बंदचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज पहिल्या दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.