नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाकडे सध्या सर्व पक्षांच्या तुलनेत सर्वांत जास्त बँक बॅलन्स असल्याची अधिकृतरीत्या समोर आले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठीचा खर्च बसपने २५ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला सादर केला आहे. बसपकडे सरकारी बँकांच्या ८ खात्यांमध्ये ६६९ कोटींची संपत्ती आहे. २०१४ च्या निवडणुकीत खातेही उघडू न शकलेल्या बसपने निवडणुकीच्या खर्चानंतर ९५.५४ लाख सध्या शिल्लक असल्याचे सांगितले आहे.
बसप पाठोपाठ लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्याशीच आघाडी केलेला सप (समाजवादी पक्ष) दुसऱ्या स्थानावर आहे. सपच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ४७१ कोटी रुपये आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा कॅश डिपॉझिट ११ कोटींनी कमी झाला.