महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांची दुसरी कोरोना चाचणीही 'पॉझिटिव्ह'

ब्राझीलमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. सुमारे 20 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 75 हजार रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. अमेरिकेनंतर कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित देश ब्राझील आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 16, 2020, 12:43 PM IST

सावो पावलो -ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांची कोरोनाची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. काल (बुधवार) त्यांची चाचणी करण्यात आली. मात्र, अजूनही त्यांना कोरोनाचा संसर्ग आहे. 7 जुलैला आपल्याला कोरोना झाल्याचे बोलसोनारो यांनी जाहीर केले होते.

'काल रात्री माझी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रात्री अहवाल आला. मला अजूनही कोरोनाचा संसर्ग आहे. मला आशा आहे, येत्या काही दिवसांत पुन्हा चाचणी करण्यात येईल. देवाच्या मर्जीनुसार सर्व काही ठीक होईल आणि मी लवकरच कामाला लागेल, असे बोलसोनारो म्हणाले.

बोलसोनारो यांनी स्वत: ला राष्ट्राध्यक्ष निवासस्थानी क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यांना कोरोनाची गंभीर लक्षणे नसून सौम्य आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधिताला ठीक होण्यास सुमारे दोन आठवड्यांचा वेळ लागतो.

कोरोनाची लागण होण्याआधी बोलसोनारो अनेक वेळा गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गेलेले होते. अनेक वेळा त्यांनी मास्कही घातले नव्हते. मलेरिया विरोधी एचसीक्यू या औषधाचे उपचार त्यांच्यावर सुरु आहेत. ब्राझीलमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. सुमारे 20 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 75 हजार रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. अमेरिकेनंतर कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित देश ब्राझील आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details