महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

करण ऑबेरॉयच्या समर्थनात 'मेन टू' मोहीम - Pooja Bedi

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात करण ओबेरॉयला गुंतवले असल्याच्या आरोप अभिनेत्री पूजा बेदीने केलाय. तो निर्दोष असल्याचे सांगत ओबेरॉय याच्या समर्थनात मेन टू ही मोहीम सुरू केली आहे.

पूजा बेदी व करण ऑबेरॉय

By

Published : May 9, 2019, 8:23 PM IST


लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला टीव्ही कलाकार करण ओबेरॉय याच्या समर्थानात बॉलिवूडचे काही जण उतरले आहेत. अभिनेत्री पूजा बेदी व सुधांशु पांडे या दोघांनी करण ओबेरॉय याच्या समर्थनात मेन टू ही मोहीम सुरू केली आहे. करण ओबेरॉय हा एक प्रामाणिक व्यक्ती असून त्यास लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात नाहक गोवले गेले असल्याचे अभिनेत्री पूजा बेदी हिने म्हटले आहे.

पूजा बेदी व करण ऑबेरॉय

एका ज्योतिषी महिलेवर अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या करण ओबेरॉय याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने करण ओबेरॉय यास 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान करण ओबेरॉय याने आपल्याला 2016 मध्ये डेटिंग वेबसाईटच्या माध्यमातून संपर्क साधून मैत्री केली होती. या नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर करण ओबेरॉय याने त्याच्या मुंबईस्थित घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवले. या नंतर करण ओबेरॉय याने सतत या महिलेशी शरीरसंबंध ठेवून अश्लील व्हिडिओ सुद्धा बनविले होते, असा आरोप तक्रादार महिलेने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून करण ओबेरॉय हा त्याच्याजवळील अश्लील व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देत पीडित तक्रादार माहिलेकडे सतत पैशांची मागणी करीत होता. या गोष्टीला कंटाळून शेवटी पीडित महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी खंडणी व लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात करण ओबेरॉय याला अटक केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details