मुंबई - अभिनेत्री नीना गुप्ता यांनी गेल्या वर्षी 'बधाई हो' या चित्रपटात भूमिका केली होती. ही भूमिका त्यांच्या करियरला पुनर्जीवन देणार होती. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे त्यांना नेहमीच गंभीर भूमिका मिळत असतात. पण त्यांना आता हलक्या फुलक्या प्रासंगिक विनोदी चित्रपटामध्ये भूमिका करुन पाहायचे आहे.
'पंगा' आणि अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी' या चित्रपटात नीना गुप्ता आईची भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांना कशा प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत, हे विचारले असता नीना गुप्ता म्हणाल्या, ''खरंच मला कॉमेडी रोल करायचा आहे. मला मनापासून कॉमेडी करण्याची इच्छा आहे. माझ्यात चांगले कॉमिक टायमिंग आहे असे मला वाटते. मला प्रासंगिक कॉमेडी करायची आहे.''
''पूर्वीची गोष्ट वेगळी होती. तुम्ही जर कॉमेडी भूमिका केली तर तोच शिक्का तुमच्यावर पडायचा. हे मी सुध्दा भोगलंय. पण आता ते दिवस गेले. त्यामुळे मी कॉमेडी करण्यासाठी उत्साही आहे.