महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

करमाळ्याच्या वडगाव दक्षिण येथे रक्तदान शिबिर; 94 जणांनी केले रक्तदान - solapur news

या शिबिरात 94 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात पंढरपूर रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले. तर शिबिरादरम्यान रक्तदात्यांना येताना तोंडाला मास्क, रुमाल वापरणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे यासारख्या नियमांचे पालन करण्यात आले.

solapur news
blood donation camp in karamala taluka at solapur district

By

Published : Jun 3, 2020, 4:31 PM IST

करमाळा (सोलापूर) - रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी व प्रशासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील वडगाव दक्षिण येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 94 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात पंढरपूर रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले.

या तर शिबिरादरम्यान रक्तदात्यांना येताना तोंडाला मास्क, रुमाल वापरणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे यासारख्या नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला ग्रामसेवक बुरके यांनी सॅनिटायझर, राम काळे यांनी हॅन्ड वॉश तर लक्ष्मण काळे यांनी साबण भेट दिला. तर शिबिरादरम्यान पृथ्वीराज काळे यांनी नाष्टा, भैरू कदम यांनी मास्क आणि श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट करमाळा यांचेकडून पाच लिटर पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला. या रक्तदान शिबिरास प्रमुख उपस्थिती म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक गणेश भाऊ करे पाटील तसेच शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे करमाळा तालुका अध्यक्ष संजय सरडे, शहराध्यक्ष उमेश सूर्यवंशी यांनी भेट दिली.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विकास गायकवाड, अंगद भांडलवलकर, निलेश भांडवलकर, निलेश भांडलवलकर, गणेश गायकवाड, मयूर गाडे, राहुल भांडवलकर, महेश काळे, विशाल वाडेकर, भरत गायकवाड, इरफान शेख, अजित गायकवाड, करण गायकवाड आणि वडगाव दक्षिण ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details