ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पालघर: कुडूस येथे विविध मागण्यांसाठी भाजपचे महाएल्गार आंदोलन - BJP yalgar protest palghar

आंदोलनादरम्यान भाजपने महाविकास आघाडीचा विरोध करत जिल्ह्यातील प्रश्न मांडले व काही मागण्या केल्या. यात वाडा-भिवंडी महामार्ग व वाडा-पिवळी-वाशिंद रस्ता दुरुस्ती करणे, रेशन धान्य वाटप, दुष्काळामुळे भातपीक शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत करणे, यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

भाजप एल्गार आंदोलन कुडूस
भाजप एल्गार आंदोलन कुडूस
author img

By

Published : Aug 1, 2020, 6:58 PM IST

पालघर- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, कोरोनामुळे कामगार कपात, यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील कुडूस येथे भाजपतर्फे महाएल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपने महाविकास आघाडीचा विरोध केेेला.

आंदोलनादरम्यान वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेत सर्व मागण्या सादर केल्या. यात वाडा-भिवंडी महामार्ग व वाडा-पिवळी-वाशिंद रस्ता दुरुस्ती करणे, रेशन धान्य वाटप, दुष्काळामुळे भातपीक शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत करणे, वीजबिल माफ करणे, गाईच्या दुधाला सरसकट प्रति लिटर 10 रुपये अनुदान देणे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.

यावेळी सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली. सामाजिक अंतर पाळून करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत सावरा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवारसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details