नांदेड- नांदेड लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज (१८ एप्रिल) चिखली (ता.कंधार) येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांनी बजावला मतदानाचा हक्क - ashok chavan
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याविरोधात प्रतापराव पाटील हे निवडणूक लढवत आहेत.

प्रताप पाटील चिखलीकर
युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांनी बजावला मतदानाचा हक्क
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याविरोधात प्रतापराव पाटील हे निवडणूक लढवत असून त्यांच्या उमेदवारीने अशोक चव्हाण यांच्यासमोर मोठे तगडे आव्हान उभे केले आहे. प्रतापरावांच्या उमेदवारीने प्रथमच काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांची प्रचारात दमछाक झाल्याचे कळते. त्यांचे गाव हे लातूर मतदारसंघातील चिखली (ता.कंधार) येथे आहे. त्यांनी दुपारी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.