नवी दिल्ली - पश्चिम बंगाल भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार देवेंद्र नाथ रॉय हे फास लावून मृत अवस्थेत आढळले होते. मात्र, त्यांची हत्या केली असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी गृहमंत्री शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदाराचा संशयास्पद मृत्यू; सीबीआय चौकशीची भाजपकडून मागणी - अमित शाह पश्चिम बंगाल
गृहमंत्र्यांना भेट दिलेल्या शिष्टमंडळामध्ये भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गिय, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, दार्जिंलिंगचे खासदार राजू बिस्ता आणि राज्यसभेचे खासदार स्वपान दासगुप्ता यांचा समावेश होता.
देवेंद्र नाथ रॉय हे हेमताबाद भागातील आमदार होते. उत्तर दिनाजपूर येथील रॉय यांच्या घरापासून जवळ असलेल्या बाजारपेठेमध्ये रॉय हे गळ्यात फास असलेल्या अवस्थेत आढळले होते. ही घटना सोमवारी घडली होती. पोलिसांना त्यांची सुसाईट नोटसुद्धा सापडली आहे. ज्यात दोघांचे नाव असल्याचे मानले जात आहे. याआधी ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला होता.
आमदार रॉय यांच्या कुटुंबीयांनी आणि तेथील भाजप नेत्यांनी रॉय यांची तृणमूल काँग्रेसने हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. गृहमंत्र्यांना भेट दिलेल्या शिष्टमंडळामध्ये भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, दार्जिंलिंगचे खासदार राजू बिस्ता आणि राज्यसभेचे खासदार स्वपान दासगुप्ता यांचा समावेश होता.