महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 13, 2020, 4:51 PM IST

Updated : Jun 13, 2020, 7:12 PM IST

ETV Bharat / briefs

महिला बचत गटांचे बँक अन् मायक्रो फायनान्स कर्ज माफ करून वसुली थांबवावी

तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला बचत गट आहेत. वेगवेगळ्या फायनान्सचे कर्ज घेतलेले अनेक नागरिक आहेत. कोरोना महामारीच्या साथीमुळे तालुक्यातील अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात मार्च 2020 पासून लॉकडाऊन असल्यामुळे महिला वर्गाचे तसेच इतर लोकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद झाले आहेत.

solapur news
solapur news

सोलापूर - सांगोला तालुक्यातील महिला बचत गटांनी घेतलेले बँकेचे आणि मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ व्हावे, तसेच इतरही बँकांच्या माध्यमातून वाटप केलेले कर्ज आणि कर्जाचे मासिक हप्ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्वरित थांबवावे. असे न केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे यांनी दिला आहे. याबाबत शिवसेनेने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला बचत गट आहेत. तसेच वेगवेगळ्या फायनान्सचे कर्ज घेतलेले अनेक नागरिक आहेत. कोरोना महामारीच्या साथीमुळे तालुक्यातील अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात मार्च 2020 पासून लॉकडाऊन असल्यामुळे महिला वर्गाचे तसेच इतर लोकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे शासनाने यासंदर्भात बँका आणि मायक्रो फायनान्स तसेच वाहनांचे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घर कर्ज, वाहन कर्ज इत्यादीं कर्जांच्या मासिक हप्त्याच्या वसुलीसाठी सक्ती करू नये, असे आदेश शासनाने दिलेले असताना शासनाच्या आदेशाचे पालन न करता बँका मायक्रो फायनान्स, फायनान्स अधिकारी आणि कर्मचारी वसुलीसाठी वारंवार महिलांना व इतर लोकांना त्रास देत आहेत.

त्यामुळे महिला वर्गाचे मानसिक संतुलन बिघडत असून त्यांच्यामध्ये आत्महत्या करण्याची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी सांगोला तालुक्यातील बंधन बँक, बुलढाणा बँक, समर्थ बँक,एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, मान देशी महिला बँक, म्हसवड बैंक एक विटास फायनान्स, फॅबटेक पतसंस्था, ग्रामशक्ती फायनान्स आशीर्वाद फायनान्स, सप्तशृंगी फायनान्स सूर्योदय फायनान्स, बजाज फायनान्स, मायक्रो फायनान्स आणि बँका यांच्याकडून महिला बचत गटाने घेतलेले कर्ज यांची वसुली थांबवून त्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी सांगोल्याच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा, तसेच तहसीलदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदनाच्या प्रतींचे मेल करून शासनाकडे केली आहे.

सांगोला तालुक्यातील बजाज फायनान्स व सर्व बँका मायक्रोफायनान्स यांनी कर्ज वसुली थांबवावी अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे यांनी दिला आहे. जर तालुक्यामध्ये कोणी सक्तीने वसुली किंवा फायनान्स बँका त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्यास त्वरित सांगोला तहसील किंवा माझ्याशी संपर्क साधावा. 9421041333 या मोबाईल क्रमांकावर त्वरित लेखी तक्रार माझ्याकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी राजे शिंदे, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे शहराध्यक्ष कमरूद्दिन भाई खतीब ,महुद शहराध्यक्ष असलम मुलानी, महुद विभाग प्रमुख संतोष खडतरे गणेश कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Jun 13, 2020, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details