महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

विश्वचषकापूर्वी बांगलादेशी खेळाडूने केला विक्रम, १६ षटकार ठोकून केले द्वीशतक पूर्ण

भारताच्या रोहित शर्माच्या नावावर ३ द्वीशतक आहेत.

By

Published : Apr 25, 2019, 7:14 PM IST

सौम्या सरकार

ढाका - भारतात सुरु असलेल्या आयपीएलमध्ये देशी-विदेशी खेळाडू विक्रमांचा धडाका लावत आहेत तर दुसरीकडे जागतिक क्रिकेटमधील संघ विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहेत. या दरम्यान बांगलादेशच्या सौम्या सरकारने एका नवा विक्रम केला आहे.

सरकारने ढाका प्रीमियर लीगमध्ये नाबाद २०८ धावांची ऐतिहासिक खेळी केली आहे. याचसोबत सौम्या लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्वीशतक करणारा पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. सौम्याची बांगलादेशच्या १५ सदस्यीय विश्वचषक संघात निवड झाली आहे. ही खेळी त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास नक्कीच मदत होणार आहे.

सौम्याने शेख जमाल धनमोंडी क्लबविरुद्ध खेळताना १५३ चेंडूत नाबाद २०८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १४ चौकार आणि १६ षटकारांची आतषबाजी केली. या धमाकेदार खेळीच्या जोरावर त्याला सामनावीरचा किताब देण्यात आला.

शेख जमाल धनमोंडी क्लबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकात ९ बाद ३१७ धावा रचल्या. ३१८ धावांचा पाठलाग करताना अबहानी लिमिटेड संघाने १७ चेंडू राखून लक्ष्य पूर्ण केले. अबहानीकडून सौम्य सरकारने २०८ आणि जहरुल इस्लाम यांने १०० धावांची खेळी केली. पहिल्या गड्यासाठी त्यांनी विक्रमी ३१२ धावांची भागीदारी रचली.

सौम्याच्या या खेळीच्या जोरावर अबाहानी लिमिटेडने केवळ सामनाच जिंकला नाही तर ढाका प्रीमियर लीगचा किताबही जिंकला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्वीशतक ठोकण्याचा पराक्रम काहीच फलंदाजांना करता आला तर आतंरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ६ फलंदाजांनी द्वीशतक झळकावले आहे. यात भारताच्या रोहित शर्माच्या नावावर ३ द्वीशतक आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details