मेलबर्न - ऑस्ट्रेलिया संघास २०१५ चा विश्वकरंडक जिंकून देण्यासाठी जोश हेजलवुड या वेगवान गोलंदाजाने महत्वाचा भूमिका बजावली होती. यंदाच्या विश्वचषकात त्याची निवड करण्यात आली नसल्याने तो निराश झाला आहे. जोश २०१७ साली जागतिक क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज होता.
विश्वकरंडकासाठी निवडलेल्या संघात स्थान न मिळाल्याने निराश आहे 'हा' खेळाडू - जोश हेजलवुड
जोश २०१७ साली जागतिक क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज होता.
हेजलवुड म्हणाला, विश्वकरंडक स्पर्धा दर चार वर्षांनी होतात. या स्पर्धेत मला प्रतिनिधीत्व करण्याची संधी न दिल्याने मी निराश झालो आहे. मागील विश्वचषक मायदेशात झाला होता. त्यात मला खेळायची संधी मिळाली होती. त्यामुळे मी स्वत:ला खूपच नशीबवान मानतो. स्पर्धेत एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाली तर मला संधी मिळू शकते.
हेजलवुड हा जानेवारी महिन्यापासून पाठदुखीने त्रस्त आहे. विश्वकरंडकापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियन संघाकडून जास्त सामने न खेळण्याने त्याला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले नाही. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला सामना यावेळी १ जून रोजी अफगाणिस्तान सोबत होणार आहे.