औरंगाबाद- नागरिकांना मतदान करावे याची जनजागृती करण्यासाठी अनेक विक्रेते, दुकानदार वेगवेगळ्या शक्कल लढवतात. परंतु, एका चहा विक्रेत्याने मतदान न करणाऱ्या ग्राहकांना चक्क चहा न देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी घेतलेल्या या चहाविक्रेत्याच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
बोटावर शाई असेल त्यालाच चहा; मतदान जागृतीसाठी विक्रेत्याची शक्कल - voting
मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या ग्राहकांना चहा न देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने स्वत:च्या व्यवसायाची देखील पर्वा केली नाही.

शहरातील कैलासनागर भागात रोहित श्रीवास्तव या तरुणाची मागील अनेक वर्षांपासून चहाचा गाडा आहे. त्याने मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या ग्राहकांना चहा न देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने स्वत:च्या व्यवसायाची देखील पर्वा केली नाही. सकाळपासून मतदान न करणाऱ्या ग्राहकांना रोहितने मतदान करा असा सल्ला देत मतदान करण्यास भाग पाडले. मतदान करून आल्यानंतरच त्यांना चहा दिला.
चहा घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या बोटावर तो मतदान केल्याची शाई पाहिल्यावरच चहा देत आहे. लोकशाही बळकट करा, पहिले मतदान करा, असे फलक त्याने चहाच्या गाडीवर लावले आहे. मतदान जागृतीसाठी करत असलेल्या तरुणाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.