धुळे- तुम्ही 'स्पेशल 26' चित्रपट तर बघितला असणार, त्या चित्रपटात काही ठगांनी व्यापारी व राजकीय नेत्यांना बनावट आयकर अधिकारी म्हणून लुटले होते. असाच प्रकार सोमवारी शिरपूर तालुक्यातील शिंगावे या ठिकाणी घडला. यात फक्त कोणी आयकर अधिकारी नाही, तर चक्क मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने आल्याचे सांगत नाशिक येथील एक पुरुष तर दोन महिलांनी रेशन दुकानदाराकडून दोन लाखाची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे.
रेशन दुकानदाराच्या समयसुचकतेने शिरपूरमध्ये 'स्पेशल २६'चा प्रयोग फसला, तोतया अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल - Store owner asked protection money shingave
मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने आल्याचे सांगत नाशिक येथील एक पुरुष तर दोन महिलांनी रेशन दुकानदाराकडून दोन लाखाची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे.
![रेशन दुकानदाराच्या समयसुचकतेने शिरपूरमध्ये 'स्पेशल २६'चा प्रयोग फसला, तोतया अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल Police station shirpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-04:29:55:1594724395-mhdhuleshirurreshandukan7204249-14072020155123-1407f-1594722083-471.jpg)
शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील रेशन दुकानदार विजय नारायण सोनवणे यांच्या दुकानासमोर काल (13 जुलै) दुपारी काळ्या रंगाची कार येऊन उभी राहिली. कारमधून दोन महिला व एक पुरुष असे तिन जण उतरले. त्यांच्यासोबत शिंगावे येथील स्थानिक रहिवासी होता. रेशन दुकानदार विजय सोनवणे याच्याकडे जाऊन आम्ही अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने तुमच्या रेशन दुकानाची तपासणी घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दुकानातील कागदपत्रे व दालनाची तपासणी केली व रेशन दुकानदार सोनवणे यास दम देऊन, तुमच्या रेशन दुकानात मोठी अफरातफर झाली आहे, तुम्ही गरजू लोकांना धान्य वाटत नाही, प्रकरण मिटवायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
दुकानदार सोनवणे यांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी शिरपूर तहसीलदार यांना याबाबत माहिती दिली. तहसीलदार यांनी असे कुठलेही पथक आलेले नसल्याचे सांगितले. दुकानदार सोनवणे यांनी तत्काळ आसपासच्या नागरिकांना आवाज देण्यास सुरवात केली. गर्दी जमत असल्याचे बघितल्यानंतर तोतया अधिकाऱ्यांनी कारमध्ये बसून पळ काढला. याबाबत 4 तोतया अधिकाऱ्यांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.