महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीवर विनोद कांबळी खूश, असे केले ट्विट - अर्जुन तेंडुलकर

प्रथम गोलंदाजी करताना अर्जुनने १ बळी घेतला तर फलंदाजीत १ षटकार आणि १ चौकार लगावत १९ चेंडूत २३ धावांची खेळी केली.

अर्जुन तेंडुलकर

By

Published : May 15, 2019, 2:58 PM IST

मुंबई - अर्जुन तेंडुलकरने अष्टपैलू कामगिरी केल्याने सलामीच्या सामन्यात आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाने ट्रम्फ नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. त्याच्या या बहारदार कामगिरीवर विनोद कांबळी जाम खूश झाला असून त्याने ट्विटवरून त्याचे अभिनंदन केले आहे.

कांबळीने लिहिले की, पूर्वी अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकर सामने जिंकून देत होते आज त्यांचा मुलगा तेच काम करत आहे. आकाश टायगर्स आणि अर्जुन दोघांनीही पदार्पणाच्या सामन्यात धमाल केली आहे. प्रथम गोलंदाजी करताना अर्जुनने १ बळी घेतला तर फलंदाजीत १ षटकार आणि १ चौकार लगावत १९ चेंडूत २३ धावांची खेळी केली. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने एमडब्लूएस संघाकडून खेळत आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळल्या जाणाऱ्या मुंबई टी-२० लीग स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. या हंगामात ८ संघांचा समावेश असून या लीगचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आला. या लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरला एमडब्लूएस संघाने ५ लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details