महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नेस्को संकुलात कोरोना रुग्णांसाठी आणखी दीड हजार खाटा - मुंबई कोरोना न्युज

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव 1500 बेड्स कार्यन्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

Mumbai
Mumbai

By

Published : Apr 12, 2021, 5:22 PM IST

मुंबई :कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. दरम्यान, कोविड सेंटरला डीआर सिस्टिम व एक्सरे मशिन–सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल. नेस्को कोविड सेंटरची गरज व रुग्णसेवेसाठी आमदार निधीतून दोन्ही मशीन्स देण्याचे सुभाष देसाई यांनी मान्य केले. तसेच, लवकरात लवकर या मशीन्स रुग्णसेवेसाठी नेस्को सेंटरला सुपूर्द केल्या जातील असे स्पष्ट केले.

देसाई यांनी नुकतेच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. नेस्को कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त संजोग कबरे, पी दक्षिण विभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त संतोषकुमार धोंडे तसेच महापालिका अधिकारी व अभियंता यावेळी उपस्थित होते. डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोबेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली.

4300 रुग्णांची सोय

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव 1500 बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी 500 बेड्स ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असतील. 15 एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या 2900 खाटांसह एकूण 4300 रुग्णांची या एकाच संकुलात सोय होईल, असेही त्यांनी म्हटले.

खबरदारी घेण्याचे आवाहन

रेमेडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे 1000 व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत., तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात यात भर पडणार आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरिक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेयाच्या सूचना देसाई यांनी दिल्या.

रोज 6 हजार जणांचे लसीकरण

नेस्को संकुलात आतापर्यंत 1,17,000 व्यक्तिंचे लसीकरण झाले असून मागील आठवड्यातील लसीकरणाचा पुरवठ्यातील खंड आता भरुन निघाला आहे. दररोज 6000 व्यक्तिंचे लसीकरण पूर्ण केले जात आहे, असे देसाई म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details