वर्धा- टिप्परने दुचाकीला कट मारल्याने अपघात होऊन एका 70 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास हिंगणघाट शहरातील तुकडोजी पुतळ्या जवळील रोडवर घडली. रामकृष्ण नारायण गाडगे ,असे मृत वृद्धाचे नाव आहे.
रांगेत उभे राहून शे-दोनशे रुपये काढले अन् घरी जायला निघाले, पण... - Hinganghat tipper bike accident
तुकडोजी चौकात रोडवरून जात असताना एका भरधाव टिप्परने क्र. (महा. 16 सीए. 0332) ओव्हरटेक करत असताना दुचाकीच्या हँडलला कट मारली. यामुळे दुचाकीस्वार रामकृष्ण नारायण गाडगे हे दुचाकीवरून पडले व टिप्परच्या मागच्या चाकात सापडले, यात त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार दिनेश गायकवाड हे टिप्परच्या विरुद्ध दिशेने पडल्याने त्यांचा प्राण वाचला, ते किरकोळ जखमी झाले.
रामकृष्ण नारायण गाडगे यांना हिंगणघाट येथील स्टेट बँकेतून निराधाराचे पैसे काढायचे होते. यासाठी हिंगणघाट येथील एका खासगी रुग्णालयात काम करणारे दिनेश किशोर गायकवाड (वय 23) हे गाडगे यांना दुचाकीने हिंगणघाटला घेऊन आले. दरम्यान, तुकडोजी चौकात रोडवरून जात असताना एका भरधाव टिप्परने क्र. (महा. 16 सीए. 0332) ओव्हरटेक करत असताना दुचाकीच्या हँडलला कट मारली. यामुळे दुचाकीस्वार रामकृष्ण नारायण गाडगे हे दुचाकीवरून पडले व टिप्परच्या मागच्या चाकात सापडले, यात त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार दिनेश गायकवाड हे टिप्परच्या विरुद्ध दिशेने पडल्याने त्यांचे प्राण वाचले, ते किरकोळ जखमी झाले.
अपघात घडताच तुकडोजी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी गर्दी हटवली व अपघाताची नोंद करत टिप्पर ताब्यात घेतला.