महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

मेहकर तालुक्यातील डोंडगाव पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव, अधिकाऱ्यासह 36 कर्मचारी विलगीकृत - Corona patients dondgaon police

पोलीस अधिकाऱ्यासह सर्व 36 कर्मचाऱ्यांना मेहकर येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे रॅपिड अँटिजेन टेस्ट होणार आहेत.

Police station dondgaon
Police station dondgaon

By

Published : Jul 26, 2020, 4:40 PM IST

बुलडाणा- मेहकर तालुक्यातील डोंडगाव पोलीस ठाण्यातील एका 28 वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने ठाण्यातील अधिकाऱ्यासह 36 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच, डोंडगाव पोलीस ठाणे सील करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्यासह सर्व 36 कर्मचाऱ्यांना मेहकर येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे रॅपिड अँटिजेन टेस्ट होणार आहे. दरम्यान, डोंडगाव पोलीस ठाण्यातील सर्व कामकाज मेहकर पोलीस ठाण्याकडे देण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डी.बी तडवी यांनी ही माहिती दिली.

कोरोना संसर्गामुळे पोलीस ठाणे सील करण्याची ही जिल्ह्यातील दुसरी घटना असून या आगोदर पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याला देखील सील करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details