अमरावती - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 800 च्या वर गेली आहे. तर संसर्गामुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (10 जुलै) सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी घोषीत केली आहे. संचारबंदी दरम्यान संपूर्ण शहरात कडकडीत बंद असून जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
कोरोनामुळे अमरावती शहर 24 मार्च ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन होते. 1 जुलैपासून शहरातील लॉकडाऊन शिथिल होताच नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्याची परवानगी मिळताच शहरात दिवसभर गर्दी होत होती. त्यामुळे कोरोना अतिशय वेगाने शहरभर पसरला.
अमरावती शहरातील हत्तीपुरा, बदनेराह, हबिबनगर, छाया कॉलनी, ताजनगर, रातनगंज, खोलपुरी गेट, मासांगनज, अंबागेट, सराफा बाजार, वडाळी, चपराशी पुरा, गाडगेनगर, शेगाव नाका, तपोवन, कंवरनगर, याशोदा नगर, दस्तुरनगर, टोपे नगर, लालखडी, कांता नगर, मांगीलाल प्लॉट, महेंद्र कॉलनी, विलास नगर, अंबापेठ, गांधी चौक , शंकर नगर, आकोली, साई नगर, अशोक नगर, अर्जुन नगर, राहाटगाव अशा सर्वच भागत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.