जयपूर (राजस्थान) -राजस्थान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी नाराजी दर्शवल्यानंतर गेले 3 दिवस राजस्थानमध्ये सत्तानाट्य सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय आमदार आणि इतर नेत्यांच्या संपत्तीवर आयकर विभाग आणि ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाला नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे हा संघर्ष आता थेट केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा सुरू झाला आहे.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 300 अधिकाऱ्यांच्या टीमने दिल्ली, राजस्थान आणि मुंबई येथील 43 ठिकाणी छापा टाकला आहे. तसेच संबंधीतांकडे करोडो रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचे आयटी विभागाने सांगितले आहे.