नवी दिल्ली - जिम्नॅस्टिक्स जगातील सर्वात खतरनाक खेळ आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या खेळात खेळाडूला दुखापत होण्याचे चान्सेस जास्त असतात. नुकतेच अभियांत्रिकीची विद्यार्थीनी असलेली अमेरिकन जिम्नास्ट सॅम सिरीओ हिला दुखापत झाल्याने जिम्नॅस्टिक्समधले करिअर संपुष्टात आले आहे.
अमेरिकन जिम्नास्ट सॅम ही जिम्नॅस्टिक्स करत असताना फ्लोअर रूटिनवर तिचा पाय घसरला आणि ती कोसळली. यात तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. एक अॅथलिट हँडस्प्रिंग डबल फ्रंट फिल्पसाठी गेला. त्यानंतर सॅम हिची वेळ आली होती. ती जिम्नॅस्टिक्स करायला मॅटवर गेली आणि त्याच क्षणी तिचा पाय घसरला ती तिथचं कोसळली. त्यात तिच्या दोन्ही पायाला दुखापत झाली आहे. त्यात तिचे दोन्ही निकामी झाले.