मुंबई - शाहरुख खानचा महत्तवकांक्षी चित्रपट झिरो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला. परंतु बॉक्स ऑफिसवर त्याला अपयश आले. यानंतर आनंद एल राय आणि शाहरुख यांचे संबंध बिनसल्याचे सांगितले जाते. इतके की, तो सध्या राय यांचा फोनही किंग खान स्वीकारत नाही.
'झिरो'नंतर शाहरुख आणि आनंद एल राय यांचे संबंध बिनसले ? - Box Office
अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या पूर्वीसारखे संबंध राहिले नसल्याचे बोलले जात आहे. झिरो या चित्रपटाच्या अपयशाला राय जबाबदार असल्याचे शाहरुखला वाटते.
झिरोच्या अपयशाला दिग्दर्शक आनंद एल राय जबाबदार असल्याचे शाहरुखला वाटते. परंतु एका आघाडीच्या वर्तमानपत्राने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. राय आणि शाहरुख यंच्यातील संबंध पूर्वीसारखेच असल्याचे यात म्हटले आहे.
झिरोच्या अपयशानंतर नवा चित्रपट बनवताना शाहरुखचे धाडस होत नसल्याची चर्चा सिनेजगतात होती. नवी स्क्रिप्ट ऐकताना तो भरपूर वेळ घेत असल्याचेही चर्चा होत असते. झिरोचे बजेट २०० कोटींचे होते. परंतु १०० कोटीचीही कमाई सिनेमा करु शकला नव्हता. यात शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांच्या भूमिका होत्या. यात बुटक्याची भूमिका शाहरुखने साकारली होती.