मुंबई - कोरोना संकटात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आरोग्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमारला तळमळ असल्याचे दिसून आले आहे. आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत अक्षय कुमारने मुंबई पोलिसांना 1 हजार आरोग्य बँड दिले असून ते मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
शिवाजी पार्क येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे बँड देण्यात आले. याची माहिती स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली. हे बँड कोरोना परिस्थितीत शरीराचे ऑक्सिजन, ब्लड प्रेशर पातळी, पल्स रेट इत्यादींवर नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांना मदत करेल.