अकोला - जुन्या वादाच्या कारणावरून मित्राचा खून करून पसार होणार्या मारेकर्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मंगेश यादव या व्यक्तीचा खून झाला असून आरोपी वैभव लक्ष्मण काळभागे याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीला बारा तासात पकडले.
पोलिसांचे यश! खून करून पसार होण्याच्या बेतात असलेल्या मारेकऱ्यास 12 तासांत पकडले
जुने शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलीस पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही काळभागे याचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काळभागे गायगावकडे जात असताना दिसून आला. पथकाने प्रसार होण्याच्या बेतात असलेल्या वैभवला अडवून त्याला ताब्यात घेतले.
जुने शहरातील हरिहर पेठ येथील शितला माता मंदिराच्या मागे असलेल्या पाईपवर मंगेश यादव व वैभव काळभागे हे बसले होते. या दोघांमधील जुना वाद उफाळून आला. त्यामध्ये त्यांचा वाद विकोपाला गेला. दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. वैभवने मंगेश याच्यावर लाकडी बांबूने जोरदार वार केला. त्यात मंगेशच्या डोक्यावर मोठी इजा झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंगेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर वैभवने तिकडून पळ काढला.
जुने शहर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलीस पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही काळभागे याचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काळभागे गायगावकडे जात असताना दिसून आला. पथकाने प्रसार होण्याच्या बेतात असलेल्या वैभवला अडवून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला जुने शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी त्याच्याविरोधात भादंवि कलम 302, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे