अकोला- रमाबाई आंबेडकर नगरातील एका घरातून अष्टधातूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती चोरी गेली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी 24 तासांच्या आत 2 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून अष्टधातूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती व रोख 2 हजार रुपये जप्त केले आहे.
डॉ. आंबेडकर मूर्ती चोरी प्रकरण; पोलिसांनी 24 तासांत आरोपींसह मूर्तीचा लावला शोध - Dr. Ambedkar idol found akola
सनी दीनेश अढाव, असे आरोपीचे नाव असून अटकेत असलेला इतर एक जण अल्पवयीन आहे. रमाबाई आंबेडकर नगर येथील ज्योती दामोदर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरात 26 ते 29 तारखेदरम्यान चोरी झाली होती.
सनी दीनेश अढाव, असे आरोपीचे नाव असून अटकेत असलेला इतर एक आरोपी अल्पवयीन आहे. रमाबाई आंबेडकर नगर येथील ज्योती दामोदर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरात 26 ते 29 तारखेदरम्यान चोरी झाली होती. यात चोरांनी रोख रक्कम तसेच थायलंडवरून आणलेली अष्टधातूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती चोरून नेली.
हे प्रकरण गांभिर्याने घेत पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी सदाशिव सुरडकर, अनिस पठाण, शेख रशीद, महेन्द्र बहादुरकर, नितीन मगर, रतन दंदी आणि धनराज ठाकूर यांनी आरोपींचा 24 तासात शोध घेतला. पोलिसांनी बाबासाहेबांच्या मूर्तीसह 2 हजार रोख रक्कम जप्त केली असून आरोपींना अटक केली.