हिंगोली - जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यात झालेल्या वादाची जोरात चर्चा सुरू आहे. जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिशय चुकीची वागणूक देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने आज सकाळपासूनच कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. हे सर्व अधिकारी कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत अधिकारी बसले होते. तर, तलाठी, कोतवाल देखील या आंदोलनात सहभागी होते.
हिंगोली : आरडीसी प्रकरण तापले; जिल्ह्यात शासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प
निवासी उपजिल्हाधिकारी यांना अतिशय चुकीची वागणूक देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकारी एकवटले आहेत. तर, दुसरीकडे पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. पोलीस अन् अत्यावश्यक सेवा वगळता सर्व विभागाचे काम बंद आंदोल सुरू आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी हे दंडाधिकारी असतानादेखील त्यांना पोलीस अधिकाऱ्याकडून अतिशय चुकीची वागणूक देण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. एवढेच नव्हे तर, हे संपूर्ण प्रकरण मिटलेले असतानाही सोशल मीडियावर या प्रकणातील बऱ्याच बाबी व्हायरल झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात हे प्रकरण खूपच तापले आहे. मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी यांना अतिशय चुकीची वागणूक देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकारी एकवटले आहेत. तर, दुसरीकडे पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. पोलीस अन् अत्यावश्यक सेवा वगळता सर्व विभागांचे काम बंद आंदोल सुरू आहे.
जिल्ह्यात सर्वच प्रशासकीय कार्यालयामध्ये आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू असल्याने कामानिमित्त आलेल्यांची गर्दी झाल्याचे दिसले. या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध संघटनेनेदेखील पाठिंबा दिला आहे. संघटनेचे सचिव रामदास पाटील, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, प्रवीण फुलारी, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरगावकर, अतिरिक्त सीईओ मिलिंद पोहरे, आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू असलेल्या काम बंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची भयंकर परिस्थिती असल्याने, आंदोलन स्थगित केले आहे. परंतु, कोणतीही कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.