मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; राज्य सरकारला मोठा दिलासा
नवी दिल्ली - मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे...वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशन : विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड; विधानसभा अध्यक्षांची घोषणा
मुंबई - विधीमंडळ अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विजय विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यासंबंधीत घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांचे अभिनंदन केले....वाचा सविस्तर
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्यंचा राजीनामा, कारण अस्पष्ट
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपला कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला आहे. त्यांची नियुक्ती 2017 मध्ये झाली होती.....वाचा सविस्तर