महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

आज...आत्ता... रविवार २३ जून, दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - died

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी राष्ट्रवादी कार्यालयात मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करीत असताना, बाहेर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक राजकारणाच्या वादातून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तर नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात चमकी तापाचा कहर सुरुच आहे. या महामारीने मृत्यू झालेल्या मुलांची संख्या १८० वर पोहोचली आहे.

महत्वाच्या घडामोडींवर एक नजर

By

Published : Jun 23, 2019, 2:19 PM IST

शरद पवार नेत्यांसोबत चर्चा करत असताना कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आपसात भिडले...वाचा सविस्तर

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवनात मराठवाड्यातील जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही आढावा बैठक राष्ट्रवादीच्या बलार्ड पियर या ठिकाणच्या कार्यालयात सुरू असतानाच कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीमधील २ नेत्यांच्या वादामधून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळासाठी वातावरण तापले होते.

बुलडाण्यात विवाहाकरिता मुलगी पाहायला गेलेल्या कुटुंबाच्या वाहनाचा अपघात; ४ ठार...वाचा सविस्तर

बुलडाणा - बोलेरो आणि सिमेंट घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले आहेत. तर बोलेरो चालकाचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात नागपूर-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक फाट्यावर झाला. हा अपघात मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास झाला. मृत प्रवासी हे औरंगाबादचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

बिहारमध्ये महामारी सुरुच; चमकी तापाने मृत्यू झालेल्या बालकांचा आकडा १८० वर...वाचा सविस्तर

मुजफ्फरपूर - बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात चमकी तापाचा कहर सुरुच आहे. एसकेएमसीएच रुग्णालयात शनिवार उशिरा रात्री एका चिमुकल्याने प्राण सोडले. त्यानंतर या महामारीने मृत्यू झालेल्या मुलांची संख्या १८० वर पोहोचली आहे. तर, शनिवारी आणखी १६ मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

यावल शहरातील प्राचीन पायविहिरीला आग, प्रशासनाच्या दुर्लक्षाने नामशेष होण्याच्या मार्गावर...वाचा सविस्तर

जळगाव - यावल येथील बसस्थानकालगत असलेली अति चीन तसेच इतिहासाची साक्ष देणारी पायविहीर अर्थात बारवला आग लागल्याची घटना शनिवारी ( २३ जून) घडली. विहिरीच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत नसल्याने आजुबाजूचे व्यावसायिक विहिरीत कचरा टाकतात. याच कचऱ्याला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

दुष्काळग्रस्तांना लालपरीची साथ, २० लाख विद्यार्थ्यांना 79 कोटी 41 लाखांची मासिक पास सवलत...वाचा सविस्तर

मुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्याथ्याना एसटीच्या नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीच्या मासिक पासची ७९ कोटी ४१ लाख ४२०९९ इतक्या रकमेची सवलत देण्यात आली आहे. सुमारे २० लाख ७८ हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निवेदनाद्वारे दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details