नांदेड- जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेता आशुतोष भाकरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून अद्याप कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेची आत्महत्या - Ashutosh bhakre suicide
अभिनेता आशुतोष भाकरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Ashutosh bhakre
भाकरे हे 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख यांचे पती आहेत. आशुतोष भाकरे यांनी 'भाकर', 'इच्यार ठरला पक्का' या चित्रपटात काम केले होते. 'खुलता कळी खुलेना' या गाजलेल्या मालिकेची नायिका मयुरी देशमुख ही त्यांची पत्नी आहे.
लॉकडाऊनच्या काळात ते आपल्या घरी म्हणजेच नांदेडला होते. आशुतोष यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून आत्महत्या केल्याचा कुटुंबीयाकडून दुजोरा मिळाला आहे.
Last Updated : Jul 31, 2020, 5:28 PM IST