महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

केवळ 'राईड जॉय'साठी स्कुटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक; शाळकरी मुलांचाही समावेश - panvel robbery news

स्कुटी चालवण्याची मजा घेता यावी म्हणून स्कुटी चोरी करणाऱ्या 10 ते 15 वर्षे वयोगटातील चार मुलांसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

panvel police
पनवेल पोलीस

By

Published : Dec 7, 2019, 11:06 PM IST

Updated : Dec 8, 2019, 11:58 AM IST

रायगड- स्कुटी चालवण्याची मजा घेता यावी म्हणून स्कुटी चोरी करणाऱ्या 10 ते 15 वर्षे वयोगटातील चार मुलांसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही मुलं स्कुटी चालवून त्यातले पेट्रोल संपले, की ज्या ठिकाणी पेट्रोल संपले त्याच ठिकाणी लावून ठेवायचे आणि पुन्हा नवीन स्कुटी चोरी करायचे. एखाद्या चित्रपटाचे कथानक वाटावं, असा हा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे.

पनवेलमध्ये स्कुटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक;

हेही वाचा -प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव

काय आहे प्रकरण-

पनवेल आणि परिसरात गेल्या काही दिवसात स्कुटी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. स्कुटी चोरी ही साधारणपणे पैशासाठीच होत असल्याने चोरटे चोरीच्या स्कुटी विकतात आणि पुन्हा नवीन चोरतात, असा पोलिसांचा आजवरचा अनुभव होता. पण, पनवेल परिसरात मागील काही दिवसात झालेल्या स्कुटी चोरांनी तर चक्क पोलिसांनाच चिंतेत टाकले होते. कारण, या चोरी झालेल्या स्कुटी पेट्रोल संपलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडत होत्या. आतापर्यंत एकूण 5 स्कुटी या बेवारस स्थितीत आढळून आल्या होत्या.

केवळ 'राईड जॉय'साठी स्कुटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक

या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर पोलिसांना आणि पालकवर्गाला चिंतेत टाकणारे एक धक्कादायक वास्तव समोर आले. कारण, ही स्कुटी चोरणारी टोळी म्हणजे प्रत्यक्षात पाचवी ते दहावीच्या वर्गात शिकणारी लहान मुलं आहेत. फक्त बाईक चालवण्याची मजा घेता यावी म्हणून ते या स्कुटी चोरी करत होते.

पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद

खारघर, पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून स्कुटी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत तपास केल्यानंतर कुठेही चोरी झालेल्या स्कुटी विकल्याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्यामुळे हा प्रकार कोण करतंय? याचा तपास करणे पनवेल पोलिसांसाठी आव्हान बनले होते. अखेर गस्त वाढवल्यावर आणि स्कुटी चोरीच्या घटनांचा बारकाईने अभ्यास केल्यावर पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करता आला.

स्कुटी चोरी करणाऱ्या टोळीला अटक

हेही वाचा -चुनाभट्टी पोलीस ठाण्यासमोरील ठिय्या आंदोलन आमदारांच्या मध्यस्थीने मागे

पनवेल परिसरात राहणारी अवघी 10 ते 15 वर्षांची मुलं स्कुटी चोरी करायचे. उद्देश एकच, बाईक चालवण्याची मजा घेता यावी. या लहान मुलांची उंची कमी असल्याने अॅक्टिव्हा, स्कुटी अशा बाईकला ते प्राधान्य द्यायचे. एका 'मास्टर की'च्या साहाय्याने स्कुटीचे हॅन्डल ओपन झाले, की प्लगच्या वायर्स जोडून ते या स्कुटी सुरू करायचे आणि पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद घ्यायचे.

स्कुटीमधले पेट्रोल संपले, की ती स्कुटी व्यवस्थित कुठेतरी लावून ठेवत, पुन्हा नवीन स्कुटी शोधायचे. केवळ राईडसाठी अशाप्रकारे या मुलांनी तब्बल तीन लाख 20 हजार रुपयांच्या 12 स्कुटी चोरल्या होत्या. याबाबत पोलिसांनी तपास करून 7 स्कुटी हस्तगत केल्या असून इतर 5 स्कुटी या आधीच बेवारस स्थितीत सापडल्या होत्या आणि सोबतच या बाईक चोरणाऱ्या या चार लहान मुलांना अटक केली. तर, आणखी दोन आरोपी पनवेल पोलिसांच्या ताब्यात आहेत.

सुशील सुनील म्हस्के (वय-45, रा. कोपरागाव, सेक्टर 10, खारघर) आणि संतोष राजकुमार कांबळे ( वय-18, रा. मालधक्का शेड, पनवेल) अशी अटक केलेल्या इतर दोन आरोपींची नावे आहेत. यातील संतोष कांबळे हा भंगार वेचण्याचे काम करत होता. या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता, त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात 10, सानपाडा पोलीस ठाण्यात 1 आणि खारघर पोलीस ठाण्यात 1 गुन्हे दाखल आहेत.

स्कुटीच्या डिक्कीतुन ड्युप्लिकेट चावीच्या मदतीने चोरी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. विकास मोहन धोत्रे (37) असे या आरोपीचे नाव असून पनवेलमधल्या आकुर्ली येथून ट्रॅप लावून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 61 हजार रुपयांची स्कुटी आणि चार ड्युप्लिकेट चाव्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

स्कुटी चालवून मजा करण्यासाठी स्कुटी चोरी करणारी सगळी मुलं अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर पालकांची चिंता वाढली असून पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण ही मुलं आपल्या मोहापायी आज अडचणीत सापडले आहेत.

Last Updated : Dec 8, 2019, 11:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details