मुंबई - रॉयल चॅलेजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज एबी डिविलियर्सने सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ७५ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीसह त्याने महेंद्र सिंह धोनीला पाठीमागे टाकले. आयपीएलमध्ये ३२ वे अर्धशतकही झळकावले. यासह त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. याचबरोबर त्याने धोनी आणि गौतम गंभीर यांनाही पाठिमागे टाकले आहे.
एबी डिविलियर्सने कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीला टाकले मागे, केला 'हा' विक्रम - undefined
डिविलियर्सने आयपीएलच्या १४९ सामन्यात ४ हजार २६० धावा केल्या आहेत. त्यात ३ शतके आणि ३२ अर्धशतके झळकावली आहेत.
डिविलियर्सने आयपीएलच्या १४९ सामन्यात ४ हजार २६० धावा केल्या आहेत. त्यात ३ शतके आणि ३२ अर्धशतके झळकावली आहेत. महेंद्र सिंह धोनीने १८३ सामन्यात ४ हजार २४६ धावा केल्या आहेत. ज्यात २२ अर्धशतके झळकावली आहेत. गौतम गंभीरने १५४ सामन्यात ३६ अर्धशतके करत ४ हजार २१७ धावा कुटल्या. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली ५ हजार २२६ धावांसह पहिल्या स्थानावर तर चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना ५ हजार १७९ धावा काढून दुसऱ्या स्थानावर आहे.
याचसोबत एबीने सोमवारच्या सामन्यात चार गगनचुंबी षटकार मारत आणखी एक नवा विक्रम केला. एबीने २०० पेक्षा जास्त षटकार खेचणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या खात्यात आता २०३ षटकारांची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ख्रिस गेलच्या (३१५) नावावर आहेत.