सोलापूर - आजच्या काळात माणुसकी, नीतिमत्ता लोप पावत चालली असून माणसे पैशाच्या मागे धावत असल्याचे बोलले जात आहे. मात्र आजच्या काळात सुद्धा नीतिमत्ता जोपासणारी माणसे समाजात अद्याप शिल्लक असल्याचा प्रत्यय बार्शी येथील एका घटनेवरून आला आहे. सात लाख रुपये रोख रक्कम रक्कम असलेली पर्स विसरलेल्या कुटुंबाला एका तरुणाने पर्स वापस करत माणुसकीचे उदाहरण दिले आहे. यशपाल बिडवे असे त्या प्रमाणिकपणा दाखवलेल्या तरुणाचे नाव आहे.
सात लाखांची रक्कम असलेली पर्स वापस करत तरुणाचे प्रामाणिकणाचे दर्शन - सोलापूर प्रवासी न्यूज
बार्शी येथील यशपाल बिडवे या तरुणाने सात लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स विसरलेल्या कुटुंबाला पर्स परत करत माणुसकीचे उदाहरण दिले आहे. त्यामुळे बिडवे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपनाचे सर्वत्र कौतुक होत असेल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
![सात लाखांची रक्कम असलेली पर्स वापस करत तरुणाचे प्रामाणिकणाचे दर्शन A young man has returned passenger's purse with 7 lakh rupees](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-06:05:47:1601987747-barshinews-06102020165439-0610f-1601983479-689.jpg)
याबाबतची अधिक माहिती अशी की बार्शी येथील यशपाल बिडवे या तरुणाचा शहरातील भवानी पेठ भागात खाजगी प्रवासी बस प्रवासी बुकिंग करण्याचे कार्यालय आहे. ते ऑनलाईन पद्धतीद्वारे प्रवासी बुकिंग करतात. नेहमी प्रमाणे ते दैनंदिन कामकाज करून आपल्या घरी जात असताना अचानक त्यांना नांदेडहुन बार्शीमार्गे मुंबईकडे जात असलेल्या एका खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स कंपनी चालकाचा फोन आला व त्यांनी बार्शी शहरातील पोस्ट चौकात त्यांच्या बसमधील एका प्रवासाची मोठी रक्कम असलेली पर्स राहिली असल्याचे सांगितले. दरम्यान, बिडवे यांनीही बार्शी पोस्ट चौकात जाऊन तेथे पाहणी केली असता तेथील रस्त्यावरील बाकड्यावर पर्स असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर प्रवासी हे परंडा जि. उस्मानाबाद मुंबईकडे जात होते. एव्हाना ते खांडवीपर्यंत पोहोचले होते.दरम्यान, बिडवेसुद्धा खांडवीच्या दिशेने रवाना झाले.
तिथे पोचल्यावर सदर पर्स संबंधित कुटुंबातील सदस्यांकडे सुपूर्द केली. संबंधित कुटुंबातील सदस्याने पर्स उघडून पाहिली असता पर्समधील सर्व रोकड व इतर साहित्य सुस्थितीत असल्याचे दिसुन आले. भर चौकात पर्स विसरल्याने चिंताग्रस्त असलेल्या कुटुंबीयांना सर्व रक्कम सुखरूप असल्याचे लक्षात आल्याने त्यांना दिलासा मिळाला. यावेळी त्यांनी बिडवे यांना पाच हजार रुपये बक्षीस देण्याचा प्रयत्न केला मात्र बिडवे यांनी माणुसकीचे दर्शन देत चक्क पैसे घेण्यास नकार दिला. त्यामुळे बिडवे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपनाचे सर्वत्र कौतुक होत असेल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.