महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

राहाता तालुक्यातील गोगलगावात आढळला कोरोनाबाधित, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू - Corona patients gogalgaon

गोगलगाव गावातील संगमनेर रोड, नामदेव हॉटेलजवळील परिसर हे कन्टेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच या क्षेत्रातील नागरिकांचे तसेच वाहनांचे ये-जा करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.

Rahata taluka corona
Rahata taluka corona

By

Published : Jul 25, 2020, 3:30 PM IST

अहमदनगर - राहाता तालुक्यातील गोगलगाव परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात गोगलगावात संगमनेर रोड, नामदेव हॉटेलजवळील परिसर हे कन्टेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच या क्षेत्रात नागरिकांचे तसेच वाहनांचे ये-जा करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.

राहाता तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर कुंदन हिरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्तू विक्री इत्‍यादी 6 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशित करण्यात आले आहे. यात, कोअर एरिया प्रतिबंधित करणे, आत किंवा बाहेर जाण्याच्या मार्गावर बॅरिकेट्स लावणे, अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही व प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडू शकणार नाही, प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या व्यक्तीची तपासणी केल्याशिवाय तिला आतमध्ये न सोडणे, प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेवून साथरोग सर्वेक्षणामार्फत पाठपुरावा करणे, प्रतिबंधित क्षेत्रात विशेष पथकाद्वारे आदेशापासून 14 दिवसापर्यंत घरोघरी सर्वेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेणे, शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संशयितांचे तपासणी नमुने घेणे, सर्वप्रकारच्या धार्मिक व सामुदायिक कार्यक्रमाला बंदी घालणे, असे आदेश आहेत.

तसेच समन्वय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा घरपोहोच सशुल्क पुरवठा करणे, सामाजिक विलगीकरणाचे कटाक्षाने पालन करणे, मशीद, मंदिर या ठिकाणी प्रार्थनेसाठी तसेच नमाज पठण, इफ्तार यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा व इतर समन्वयकाची जबाबदारी तालुका आरेाग्य अधिकारी यांची राहील. दूध, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू यांचे नियोजन संबधित सहाय्यक नियंत्रण अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी करावे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी 24 बाय 7 पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक, लोणी यांनी लावणे असेही आदेशित करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details