महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

म्यानमारमध्ये खाण अपघातात 96 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुसळधार पावसामुळे खाणीमध्ये दरड कोसळली, यावेळी अनेक कामगार आतमध्ये काम करत होते. हपाकांत गावाजवळील साटे मु खेडेगावाजवळ ही घटना घडली.

म्यानमार खाण अपघात
म्यानमार खाण अपघात

By

Published : Jul 2, 2020, 1:42 PM IST

यंगून - म्यानमारमध्ये खाण दुर्घटनेत सुमारे 96 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडक्यामुळे बेपत्ता झाले आहेत. खाणीमध्ये कामगार काम करत असताना अचानक दरड कोसळली. काचिन राज्यातील जेड खाणीमध्ये ही दुर्घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज(गुरुवार) सकाळी 8.00 वाजता ही दुर्घटना घडली.

मुसळधार पावसामुळे खाणीमध्ये दरड कोसळली, यावेळी अनेक कामगार आतमध्ये काम करत होते. हपाकांत गावाजवळील साटे मु खेडेगावाजवळ ही घटना घडली. नक्की किती कामगाराचां मृत्यू झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. सध्या आपत्ती निवारण पथकांनी बचावकार्य हाती घेतले आहे.

दरड कोसळण्याच्या घटना काचिन राज्यामध्ये सर्रास घडतात. 2015 साली झालेल्या भूसख्खलनात 116 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा मोठी दुर्घटना झाली आहे. पावसामुळे खाणीचा भाग सैल होऊन अनेक वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडतात.

ABOUT THE AUTHOR

...view details