पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात सर्वाधिक 927 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 15 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात लॉकडाऊन लागू आहे. मात्र, याचा परिणाम कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत नसल्याचे सध्या शहरात पाहायला मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात रेकॉर्डब्रेक आकडेवारी, 927 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद - Corona patients number pune
पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांचा एकूण आकडा 13 हजार 107 वर पोहोचला असून आतापर्यंत 8 हजार 40 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आज 203 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांचा एकूण आकडा 13 हजार 107 वर पोहोचला असून आतापर्यंत 8 हजार 40 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आज 203 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर, सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 379 एवढी आहे. आजची आकडेवारी नागरिकांना चिंतेत टाकणारी आहे. नागरिकांनी देखील बेजबाबदारपणे न वागत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
आज मृत झालेले रुग्ण काळेवाडी (स्त्री 60 वर्षे), नेहरुनगर (स्त्री 75 वर्षे, पुरुष 60 वर्षे), आकुर्डी (पुरुष 63 वर्षे), थेरगाव (पुरुष 56 वर्षे), वाल्हेकरवाडी (स्त्री 50 वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष 75 वर्षे), पुनावळे (पुरुष 38 वर्षे), मोरवाडी (पुरुष 67 वर्षे), रहाटणी (पुरुष 58 वर्षे,पुरुष 43 वर्षे), आकुर्डी (पुरुष 62 वर्षे), जुन्नर (स्त्री 80 वर्षे), चाकण (पुरुष 49 वर्षे), स्वारगेट (स्त्री 56 वर्षे) येथील रहिवासी आहेत.