महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पालघर जिल्ह्यात 92 कोरोना पॉझिटिव्ह; 64 रुग्ण कोरोनामुक्त - कोरोना आढावा पालघर

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 930 इतकी झाली असून, 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 494 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 423 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Corona update palghar
Corona update palghar

By

Published : Jun 27, 2020, 8:43 PM IST

पालघर- जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 24 तासात 92 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, आज 64 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज अढळलेल्या 92 कोरोना रुग्णांपैैकी 24 रुग्ण पालघर तालुक्यातील, 3 डहाणू तालुक्यातील, 34 जव्हार तालुक्यातील, 18 विक्रमगड तालुक्यातील आणि 13 वसई ग्रामीण भागातील आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 930 इतकी झाली असून, 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 494 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 423 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details