औरंगाबाद- कन्नड तालुक्यामध्ये आज 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यात मुंडवाडी 1, रायगाव 1, कन्नड शहर येथील 7 रहिवासींचा समावेश आहे. 9 रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णांचे राहते घर, रस्ते, गाव प्रतिबंधित करण्यात आले आहे.
कन्नड तालुक्यात आज 9 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 2 रुग्णांचा मृत्यू
कन्नड शहरामध्ये आज पर्यंत 28 रुग्ण व ग्रामीणमध्ये 35 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आजपर्यंत कन्नड तालुक्यामध्ये एकूण 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 27 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 4 रुग्णांना औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले असून तेथे उपचार चालू आहे. 6 रुग्णांचा नाशिक, औरंगाबाद येथे उपचार चालू आहे. 26 रुग्णांचा उपचार ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे चालू आहे व 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कन्नड शहरामध्ये आज पर्यंत 28 रुग्ण व ग्रामीणमध्ये 35 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळे आहेत, त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, मुख्याधिकारी नंदा गायकवाड़, गटनेता संतोष कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, डॉ. प्रवीण पवार यांनी पाहणी केली व नगरपरिषदेच्या वतीने त्या भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.