नाशिक- दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून, 8 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 124 वर गेली आहे, तर उमराळे बु. येथील एक महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने कोरोना मृतकांची संख्या 4 वर गेली आहे.
दिंडोरी तालुक्यात 8 नवे कोरोनाबाधित, एकूण रुग्ण संख्या 124 वर - Corona patients dindori
कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या मोहाडीतील सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिंडोरी तालुक्यात 81 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 38 जणांवर उपचार सुरू आहे. तालुका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

8 नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये, लखमापूर येथील रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 4, 24, 28 वर्षाचे तीन रुग्ण, तर ओझरखेड येथील जवळच्या संपर्कातील 23 वर्षीय, मडकीजाम येथील 35 वर्षीय महिला, चिंचखेड येथील रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 29 वर्षीय महिला, आंबे दिंडोरी येथील रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 31 वर्षीय महिला व तळेगावदिंडोरी येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या मोहाडीतील सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिंडोरी तालुक्यात 81 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 38 जणांवर उपचार सुरू आहे. तालुका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.