महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

Pune Corona Update : पुणे विभागातील 7 हजार 896 रुग्ण कोरोनामुक्त - corona positive patients pune

पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.36 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्हयातील 9 हजार 851 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 6 हजार 235 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 184 आहे.

pune corona news
pune corona news

By

Published : Jun 9, 2020, 8:39 PM IST

पुणे- आतापर्यंत विभागातील 7 हजार 896 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 662 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 171 झाली आहे. आतापर्यंत पुणे विभागात एकुण 595 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 248 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.36 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्हयातील 9 हजार 851 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 6 हजार 235 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 184 आहे. कोरोनाबाधित एकूण 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 238 रुग्ण गंभीर असून उर्वरित रूग्ण हे निरीक्षणाखाली आहेत.

पुणे जिल्हयामध्ये कोरोनातून बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.29 टक्के आहे. सोमवारच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 244 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 200, सातारा जिल्ह्यात 18, सोलापूर जिल्ह्यात 8, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 649 कोरोना बाधित रुग्ण असून 368 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 253 आहे. तर कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 1303 कोरोना बाधित रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 457 आहे. आतापर्यंत एकूण 121 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील 172 कोरोनाबाधित रुग्ण असून 96 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही 70 आहे. आतापर्यंत एकूण 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 687 कोरोनाबाधित रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 207 आहे. तर एकूण 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत (मंगळवार) विभागामध्ये एकूण 1 लाख 3 हजार 442 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 99 हजार 848 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 594 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. आमध्ये प्राप्त अहवालांपैकी 86 हजार 985 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 12 हजार 662 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details