महाराष्ट्र

maharashtra

आमदार रवी राणांच्या आई-वडिलांसह कुटुंबातील 7 जणांना कोरोना, अंगरक्षकही बाधित

By

Published : Aug 2, 2020, 10:04 PM IST

आज राणा कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी केली असता आमदार राणा यांची आई, नागपूरवरून आलेली बहीण, अमरावती येथे राहणारे जावई आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी तसेच आमदार राणा यांचा 12 वर्षांचा पुतण्या आणि आमदार राणा याच्या अंगरक्षकाला कोरोना झाल्याचे समोर आले.

Mp Navneet kaur
Mp Navneet kaur

अमरावती- बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा याच्या आई-वडीलांसह कुटुंबातील 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या आमदार, खासदार, घरातील सर्व सदस्य आणि घरगडी व कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

आमदार रवी राणा आणि त्यांचे भाऊ सुनील राणा यांच्यासह घरात त्यांचे आई-वडील एकत्र राहत असून कुटुंबत एकूण 10 सदस्य आहेत. राखी सणाच्या निमित्ताने आमदार रवी राणा यांची एक बहीण नागपूर येथून त्यांच्या शंकर नगर परिसरातील घरी आली होती. तर, अमरावतीत राहणारी बहीण आणि जावई देखील त्यांच्या मुलांसह रवी राणा यांच्या घरी आले होते.

दरम्यान, आमदार राणा यांचे वडील गंगाधर राणा यांना शनिवारी रात्री अस्वस्थ वाटायला लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता ते पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज राणा कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी केली असता आमदार राणा यांची आई, नागपूरवरून आलेली बहीण, अमरावती येथे राहणारे जावई आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी तसेच आमदार राणा यांचा 12 वर्षांचा पुतण्या आणि आमदार राणा याच्या अंगरक्षकाला कोरोना झाल्याचे समोर आले.

दरम्यान, एकाच कुटुंबातील 6 जण आणि तेही जिल्ह्याच्या खासदार आणि बडनेरा विधानसभा मतदार संघाच्या आमदारांच्या कुटुंबात कोरोना रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राणा कुटुंबातील सहाही जणांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले असून अंगरक्षकाला अमरावतीच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details