महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

कोरोना काळात रजिस्टर लग्न करून 69 जोडप्यांनी सुरू केला संसार - Raigad registered marriage news

यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे लग्नसोहळ्यावर निर्बंध आले. कोरोना काळात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर लोकांना येण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे अनेक जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिली.

69 couples got married During the Corona period in raigad
69 couples got married During the Corona period in raigad

By

Published : Oct 7, 2020, 11:00 PM IST

रायगड - एरव्ही नातेवाईकांच्या हजेरीत धुमधडाक्यात होणाऱ्या सोहळ्याला यंदा कोरोनामुळे ग्रहण लागले आहे. त्यामुळे अनेक लग्न सोहळे हे रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीही कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत नोंदणी विवाह पार पडले आहेत. जिल्ह्यातील 69 जोडपी ही नोंदणी पद्धतीने विवाह बंधनात अडकली आहे.

लग्नाचा बडेजाव न करता, 69 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न करून आपले नवे जीवन सुरू केले आहे. यामुळे लग्न समारंभात होणारा खर्चही वाचला असून कमी लोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून हे विवाह सोहळे झाले आहेत.

जिल्ह्यातील दुय्यम निबंधक आणि विवाह अधिकारी यांच्याकडे 8 मे ते 6 ऑक्टोबर या दरम्यान 69 जोडप्यांनी रजिस्टर विवाह करण्यास अर्ज केले होते. या सर्व जोडप्याची लग्न नोंदणी पध्दतीने पद्धतीने लावण्यात आली अशी माहिती, दुय्यम निबंधक आणि विवाह अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details