औरंगाबाद- काल सायंकाळी पैठण शहरातील नेहरू चौक परिसर येथील दारूसलाम मोहल्ला भागातील 65 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या निर्देशानुसार तालुका प्रशासनाने तातडीने सतर्कता हाती घेतली आहे. तसेच जिल्हा प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांनी आज दुपारी रुग्णाचे निवासस्थान व कन्टेन्मेंट झोन परिसरात भेट दिली आहे.
पैठण शहरात 65 वर्षीय वृद्धा कोरोनाबाधित; प्रशासन सतर्क - 65 वर्षीय कोरोनाबाधित औरंगाबाद
परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफावांवर विश्वास ठेवू नये. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, नगर परिषद मुख्यधिकारी सोमनाथ पाटील जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे प्र-पाठक डॉ. रुषीकेश खाडीलकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, गोपनीय शाखेचे गणेश शर्मा, नपचे स्वच्छता निरीक्षक भगवानकाका कुलकर्णी, अश्विन गोजरे, वरिष्ठ तलाठी भैरवनाथ गाढे, नारायण वाघ यांनी रुग्ण निवास व कन्टेनमेंट झोन परिसरात प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची पाहाणी केली. रुग्णाच्या संपर्कातील 12 जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी औरंगाबादला पाठवण्यात आले आहेत. शिवाय 40 जणांचे गृह विलगीकरण करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफावांवर विश्वास ठेवू नये. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.