अकोला - आज सकाळी आलेल्या कोरोना अहवालांमध्ये 40 जण, तर काल रात्री 22 जण हे रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अकोल्यातील रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे.
आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या 40 जणांमध्ये 24 महिला व 16 पुरुष आहेत. त्यातील 16 जण हे पातूर येथील, 3 जण हिवरखेड येथील, बोरगाव मंजू, सातव चौक, खदान, अकोली जहांगीर, वाडेगाव, आलेगाव येथील प्रत्येकी 2, तर मोठी उमरी, लोकमान्य नगर, अकोट, सिंधी कॅम्प, जीएमसी होस्टेल, खडकी, विजय नगर, न्यू भीम नगर व रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
काल रात्री रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ज्या 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्येत व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.
सकाळी प्राप्त अहवालानुसार
प्राप्त अहवाल- 193
पॉझिटिव्ह- 40