वर्धा - सावंगी पोलीस ठाण्यांतर्गत सेलसुरा शिवारात नोकरीसाठी मुलाखत घ्यायची आहे, असे सांगून एका विवाहितेवर काल रात्री अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 6 जणांना सावंगी पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
संतापजनक.. पतीसमोरच विवाहितेवर सामूहिक बलात्कार, वर्ध्यातील घटना - Women molested selsura
शेखर चंदनखेडे याचा सिंदी (रेल्वे) येथील विवाहितेशी संपर्क झाला. त्यानंतर फोनवरून नौकरीसाठी मुलाखत घायचे आहे असे सांगून पीडितेला घटनास्थळावर बोलवण्यात आले. पीडित महिला ही पतीसोबत त्या ठिकाणी गेली असता उपस्थित आरोपीने तिच्या पतीला बांधून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
शेखर सुरेश चंदनखेडे (वय 24), लोकेश उर्फ अभिजीत गजानन इंगोले (वय 24 रा. तुकाराम वॉर्ड), हेमराज बाबा भोयर (वय 39 रा. सिंदी मेघे) तर खरांगणा येथील राहुल बनराज गाडगे (वय 28), नितीन मारोतराव चावरे (वय 27), पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (वय 26 रा. सिंदी मेघे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शेखर चंदनखेडे याचा सिंदी (रेल्वे) येथील विवाहितेशी संपर्क झाला. त्यानंतर फोनवरून नौकरीसाठी मुलाखत घायचे आहे असे सांगून विवाहितेला घटनास्थळावर बोलवण्यात आले. पीडित महिला ही पतीसोबत त्या ठिकाणी गेली असता उपस्थित आरोपीने तिच्या पतीला बांधून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. यानंतर पीडित महिलेने तेथून निघताच सदर प्रकार सावंगी पोलिसांना सांगितला. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांची चमू करत आहे.