पुणे- बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती ही करोना संशयित असून तिचे स्वॅब तपासणी अहवाल अद्याप आलेले नाही, असे आरोग्य प्रशासनाने सांगितले.
बारामती तालुक्यात 58 वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीचा मृत्यू
मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने घेतले आहे. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे त्यांना करोना संशयित समजले जात आहे. दरम्यान, सदर कोरोना संशयित रुग्णावर शासकीय पातळीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
मृत व्यक्तीला मागील 3 दिवसांपासून त्रास जाणवत होता. आज शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. मात्र येथील डॉक्टरांनी रुई येथे जाऊन तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सदर व्यक्तीस रुई येथील कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये नेण्यात आले होते. मात्र येथे करोनाचे रुग्ण असतात त्यामुळे मला उपचारासाठी पुण्याला घेऊन चला, असा आग्रह व्यक्तीने त्याच्या नातेवाईकांकडे केला. त्यानुसार सदर व्यक्तीला पुणे येथे घेऊन जात असताना प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने घेतले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे त्यांना कोरोना संशयित समजले जात आहे. दरम्यान, सदर कोरोना संशयित रुग्णावर शासकीय पातळीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.