महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पिंपरी-चिंचवडमध्ये 547 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 17 जणांचा मृत्यू

शहरातील बाधित रुग्णांची संख्या 9 हजार 104 वर पोहोचली असून सक्रिय रुग्णांचा आकडा 2 हजार 337 वर पोहोचला आहे. शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, आत्तापर्यंत 5 हजार 559 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

Nutan bhosri hospital
Nutan bhosri hospital

By

Published : Jul 16, 2020, 10:52 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात सध्या दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू असून आजचा तिसरा दिवस आहे. मात्र लॉकडाऊन असून देखील शहरातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 547 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 324 जण आज कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील बाधित रुग्णांची संख्या 9 हजार 104 वर पोहोचली असून सक्रिय रुग्णांचा आकडा 2 हजार 337 वर पोहोचला आहे. शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, आत्तापर्यंत 5 हजार 559 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरातील 156 आणि ग्रामीण भागातील 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन केल्यापासून शहरातील आकडेवारी आटोक्यात आलेली नाही उलट दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मोहननगर चिंचवड (पुरुष,63 वर्षे), पिंपरी (स्त्री, 65 वर्षे), आकुर्डी (पुरुष,25 वर्षे), मिलिंदनगर (स्त्री,63 वर्षे), चिंचवड (पुरुष,76 वर्षे), नवीसांगवी (पुरुष,70 वर्षे), थेरगाव (पुरुष,65 वर्षे), तळवडे (स्त्री,64 वर्षे, मोशी (स्त्री,65 वर्षे), निगडी (पुरुष, 59 वर्षे), निगडी (स्त्री, 73 वर्षे), यमुनानगर (स्त्री,76 वर्षे), चिंचवड (पुरुष,48 वर्षे), चाकण (पुरुष,57 वर्षे), तळेगाव रोड (पुरुष,58 वर्षे), कात्रज (पुरुष,77 वर्षे), महाबळेश्वर (पुरुष,77 वर्षे) येथील रहिवासी आहेत.

शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन झाल्यापासूनची आकडेवारी

दिनांक:- 16 जुलै- 547 कोरोनाबाधित / 17 जणांचा मृत्यू / 324 कोरोनामुक्त

दिनांक:- 15 जुलै- 449 कोरोनाबाधित / 15 जणांचा मृत्यू / 356 कोरोनामुक्त

दिनांक:- 14 जुलै- 557 कोरोनाबाधित / 11 जणांचा मृत्यू / 281 कोरोनामुक्त

ABOUT THE AUTHOR

...view details