महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पुण्यात आज दिवसभरात 523 नवे कोरोनाबाधित; 25 रुग्णांचा मृत्यू - 523 new corona patient pune

राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 16 हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jun 28, 2020, 10:01 PM IST

पुणे- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात (रविवार) या रोगामुळे आणखी 25 जणांचा मृत्यू झाला असून, 523 नवीन रुग्ण आढळले आहेत. पुुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 613 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 324 रुग्ण गंभीर असून यातील 24 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

आजपर्यंत पुण्यात एकूण 16 हजार 125 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 9 हजार 447 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बऱ्या झालेल्या 328 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 6 हजार 65 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 613 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 16 हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details