महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

आयपीएल बेटिंग चालवणाऱ्या ५ जणांना अटक - बेटिंग

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट ७ ने ही कारवाई केली

बेटिंग चालवणाऱ्या ५ जणांना अटक

By

Published : Apr 18, 2019, 5:19 PM IST

मुंबई- जयपूर येथे १६ एप्रिलला खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यावर बेटिंग चालवणाऱ्या ५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राच युनिट ७ ने ही कारवाई केली आहे.

आयपीएल बेटिंग चालवणाऱ्या ५ जणांना अटक

कांदिवली पश्चिम येथे एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये काहीजण आयपीएल सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

सध्या देशात आयपीएलचा हंगाम सुरू असून यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्याने याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेले ५ आरोपी dimondexch9.com, playwin247.com या संकेतस्थळावरून बेटिंग कोडवर्डमध्ये घेत होते. आरोपींकडून पोलिसांनी २६ मोबाईल, १ लॅपटॉप, १ टीव्ही, कार्ड स्वापिंग युनिट सह ९१ हजार रुपये हस्तगत केले आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी मुंबई, दिल्ली, जयपूरसह आंतराष्ट्रीय बुकींच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details