अकोला - कोरोना तपासणी अहवालात आज दिवसभरात 29 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर रॅपिड अँटिजेन टेस्टमधून 20 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असूूून 60 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या 29 जणांमध्ये 11 महिला व 18 पुरुष आहेत. त्यातील 12 जण हे अकोट येथील रहिवासी आहेत. तर 3 जण शास्त्री नगर, 2 जण रामनगर, 2 जण केशव नगर, तर उर्वरित बाबुलगाव (ता. बार्शीटाकळी), जेलक्वार्टर, तेल्हारा, गुरुप्रितनगर, आळशीप्लॉट येथील प्रत्येकी एक व पारस अकोला व सिरसार मूर्तिजापूर येथील प्रत्येकी 2 जण आहेत. तर मलकापूर, अकोला येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, काल रात्री रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्येत व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. दरम्यान, आज एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण गंगानगर, अकोला येथील 70 वर्षीय पुरुष असून तो 11 जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाला होता.
दरम्यान, आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 6 जण, कोविड केअर सेंटर अकोला येथील 46 जण, कोविड रुग्णालय मूर्तिजापूर येथील 6 जण तर आयकॉन रुग्णालयातील 2 जण असे एकूण 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज प्राप्त अहवालानुसार
प्राप्त अहवाल- 321